हरोली येथे दि.२९ रोजी संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य निर्यापक श्रमण श्री १०८ नियमसागर महाराज यांचे ससंघ आगमन झाले आहे.
गेले २ महिने नियमसागर महाराज आणि संघ यांचा चातुर्मास कुठे होणार याची उत्सुकता संपूर्ण दिगंबर जैन समाजात होती. अखेरीस हरोली येथे चातुर्मास होणार असल्याचे ठरले.
उद्या दिनांक २ जुलै रोजी हरोली येथील १०८ पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिरात चातुर्मास स्थापना होणार आहे. तसेच दि. ३जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त दुपारी २ वाजता गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम होणार आहे.
चातुर्मासानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातून धार्मिक प्रबोधन तसेच प्रभावना होते .म्हणून श्रावकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा असे आवाहन समस्त दिगंबर जैन समाज हरोली यांचेकडून करण्यात आले आहे.
दिगंबर जैन समाज हरोली यांचेकडून करण्यात आलेले आवाहन



Good information. 👍
ReplyDelete