जैन मुनि 108 कामकुमार नंदी यांची निर्घृण हत्या
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील, चिकोडी तालुक्यात हिरेकोडी येथे जैन मुनी श्री. जैन मुनि 108 कामकुमार नंदी महाराज यांची परिचित व्यक्तीने हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
आचार्य कामकुमार नंदी चैरिटेबल ट्रस्टचे ते प्रमुख होते. गेल्या पंधरा वर्षांपासून ते नंदी पर्वत आश्रम येथे राहत होते.
आश्रमाने दिलेल्या माहितीनुसार, ते गुरूवारी अचानक गायब झाले. मुनी महाराज परत न आल्याने त्यांच्या शिष्यांची चिंता वाढली.
सर्वत्र शोध घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र ते काही आढळून आले नाहीत. त्यामूळे कामकुमार नंदी चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उदारे यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
मिसिंग ची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता. एका परिचित व्यक्तीचा मुनींच्या गायब होण्यात हात असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
मुनी श्री कामकुमार नंदी महाराज यांचे अपहरण करून हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हत्येनंतर आरोपींनी मुनीश्रींच्या देहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आहेत.
तसेच मृतदेहाचा भाग रिकाम्या कुपनलिकेत हि टाकला आहे. या घटनेनंतर बेळगाव जिल्ह्यातील अस्वस्थता वाढली आहे.
हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिस यंत्रणा अधिक तपास करत आहेत.

Comments
Post a Comment